पावसाळ्याच्या दिवसात उत्पन्न होणाऱ्या सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय

आरोग्य

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून.

खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

आव (रक्त पडत नसेल तर): मिरी + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण.

तोंड येणे: जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन: भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा + लिंबू

जंत कृमी: वावडिंगाचे चूर्ण मधातून, कपिल्लाची गोळी गुळातून.

सांधे दुखी: सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक.

मूत्र विकार: धने जिऱ्याचे पाणी, वाळ्याचे सरबत, गोखरूचा काढा.

रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे): लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण.

मानसिक व्यथा (झोप न येणे, चिंता): वेखंडाची पूड हातापायास चोळणे, कांद्याची दह्यातील कोशिंबीर.

पित्त उठणे, अ‍ॅलर्जी: अमसुलाचे पाणी

भाजणे, पोळणे: तूप लावणे

जखमा: स्वच्छ खोबरेल तेल लावणे.

दातदुखी: तुपाचा बोळा लावणे.

कानदुखी: लसणीचे तेल कानात घालणे.

त्वचेचे सामान्य विकार: हळदीचा लेप गोमूत्रातून, पोटात हिरडा उगाळून, तुळशीचा रस लावण्यासाठी.

(सोशल मीडियावरून साभार)