दातांची स्वच्छता व मजबूतीसाठी
पहिला प्रयोग: लिंबाच्या सालीवर थोडेसे मोहरीचे तेल टाकून दात व हिरड्या घासल्याने दात पांढरे व चमकदार होतात. हिरड्या बळकट होतात, सर्व प्रकारच्या जिवाणूंचा नाश होतो तसेच पायरीया इ. रोगांपासून रक्षण होते. मशीनच्या सहाय्याने दातांची सफाई करणे फारसे हितकर नाही.
दुसरा प्रयोग: वड आणि करंजाच्या दातवणाने दात घासल्यास दात बळकट राहतात.
तिसरा प्रयोग: पेरूची पाने चांगली चावून, त्याचा रस तोंडात फिरवून,काही वेळा ठेवून नंतर थुकून दिल्याने किंवा पेरूची साल पाण्यात उकळून त्याने चूळ भरल्याने दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे, दातांची दुर्गंधी इत्यादींमध्ये फायदा होतो.
दाढदुखी: कापराची गोळी अथवा लवंग किंवा मोहरीचे तेल किंवा वडाच्या दुधात भिजविलेला कापसाचा बोळा अथवा तुपात तळलेला हिंगाचा तुकडा दाढेखाली ठेवल्याने दाढदुखी आराम मिळतो.
हिरड्यांची सूज: जांभळाच्या झाडाच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या केल्याने दातांच्या हिरड्यांची सूज दूर होते व हलणारे दात मजबूत होतात.
दात आंबल्यास: तिळाच्या तेलात दळलेले मीठ घालून बोटाने दररोज दात घासल्याने दात आंबण्याचे लक्षण दूर होते.
किडलेल्या अवस्थेतील दातांसाठी
हाताच्या बोटाने दिवसातून तीन वेळा दातांना व हिरड्यांना तिळाच्या तेलाने मालिश करावी. सात दिवसानंतर वडाचे दातवण चावून मऊ झाल्यावर त्याने दात घासावेत. तिळाचे तेल तोंडात घेऊन जितका वेळ शक्य असेल तितका वेळ ठेवावे. तोंड आतड्यांचा आरसा आहे. म्हणून पोट साफ ठेवण्यासाठी छोटा हिरडा चावून खावा.
रक्तस्राव बंद करण्यासाठी: मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तसेच काथ किंवा हळदीचे चूर्ण लावल्याने दात पडल्यामुळे होणारा रक्तस्राव बंद होतो.
पायरीया
पहिला प्रयोग: लिंबाच्या पानाच्या राखेत कोळशाचा चूरा व कपूर घालून रोज रात्री हिरड्यांवर लावून झोपल्याने पायरीयात फायदा होतो.
दुसरा प्रयोग: मोहरीच्या तेलात सैंधव मीठ घालून दातांना लावल्याने दातांमध्ये येणारी दुर्गंधी व रक्त बंद होऊन दात मजबूत होतात व पायरिया मुळापासून दूर होतो. याबरोबरच त्रिफळा गुग्गुळाच्या १ ते ३ गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्याव्यात व रात्री १ ते ३ ग्रॅम त्रिफळा चूर्ण घ्यावे.
दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तीन गोष्टींपासून सदैव दूर रहा.
1) पांढरी शुभ्र साखर.
२) मैदा ( बेकरी products, चाॕकलेट etc).
३) पांढरा शुभ्र तांदूळ.
(सोशल मीडियावरून साभार)