अभिनेते रसिक दवे यांचे निधन

इतर

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

रसिक दवे यांना किडनीचा त्रास होता. किडनी निकामी झाल्याने शुक्रवार (दि. २९) रोजी त्यांचे निधन झाले. रसिक दवे यांची पत्नी टीव्ही अभिनेत्री केतकी दवे हिने सांगितले की,’ते गेल्या 2 वर्षांपासून डायलिसिसवर होते आणि शेवटचा 1 महिना त्यांच्यासाठी खूप वेदनादायी होता.’ रसिक दवे यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

अनेक कलाकारांसोबत त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. रसिक दवे हे टीव्ही शोमधील वेगळ्या अभिनयासाठी ओळखले जात होते. गुजराती सिनेमातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ते हिंदी चित्रपटसृष्टीत आले. सर्वात हिट पौराणिक मालिका महाभारतात नंदची भूमिका साकारली होती. रसिक दवे यांनी आपल्या भूमिकेसाठी खूप चर्चेत राहिले होते. ९० च्या दशकातील प्रसिद्ध गुप्तहेर मालिका ब्योमकेश बक्षीमध्येही त्यांनी काम केले होते.