डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय

आरोग्य

वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे. याला आजकालची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असतात. जर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर डोळ्यांनी धुसर दिसू लागतं. अशात कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो.

डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा उपाय 

जेवण केल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासा. त्यानंतर दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. हातांची उष्णता डोळ्यांना द्या आणि असं दोन ते तीन वेळा करा. नियमितपणे ही क्रिया केल्याने डोळ्यांनी धुसर दिसण्याचा धोका कमी होतो.

डोळे हेल्दी ठेवणारे फूड्स

गाजर, पालक, अंड्याचा पिवळा भाग यातून डोळ्यांना व्हिटॅमिन ए मिळतं. त्याशिवाय ब्रोकली, संत्री यातून व्हिटॅमिन सी मिळतं. इतर पोषक तत्व घेण्यासाठी बदाम, सूर्यफुलाच्या बीया, डार्क चॉकलेट, नट्स इत्यादीचं सेवन करावं.

(सोशल मीडियावरून साभार)