बाजरी किती गुणकारी

आरोग्य

सध्या थंडीचे दिवस आलेले आहेत. आपण बाजरीची भाकरी खातो, ती फक्त संक्रांती दिवशी न खाता या थंडीच्या तीनही महिन्यांमध्ये खाल्ली पाहिजे.

बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे त्यामुळे हृदय चांगले राहते.

बाजरीतील पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

बाजरी मध्ये फायटिक ऍसिड, फेनोल आणि टानिन हे तीन अँटिऑक्सिडंट आहेत.

बाजरीमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.

बाजरीत खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ होते.

बाजरीमध्ये झिंक विपुल असल्यामुळे त्वचा चांगली होते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.

बाजरीतील फॉस्फरस मुळे हाडे बळकट होतात.

ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी बाजरी खावी.

प्रोटीन भरपूर प्रमाणात देणारी बाजरी थंडीच्या दिवसात रोज खा आणि उत्साही बना.

(सोशल मीडियावरून साभार)