१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे…

आरोग्य

दुधात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद असलेले दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया १ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

1) दररोज रात्री एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर सांधे दुखीत आराम मिळतो. आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात.

2) सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास सर्दी कमी होण्यास मदत मिळेल.

3) रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

4) एक कप हळदीचे दूध पिल्यास पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात.

5) हळदीचे दूध पिल्यास चेहऱ्यावर चमक येते आणि मुरुम आणि सुरुकुत्या कमी होतात.

6) रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर चांगली झोप येइल.

7) खोकला येत असल्यास हळद असलेले दूध पिल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळते.

8) रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

9) कोमट दुधात हळद टाकुन पिल्यास मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

10) हळद अँटीकँसरस असल्यामुळे नियमित हळददूध घेण्याने कँसर होण्याचा धोका टळू शकतो.

(सोशल मीडियावरुन साभार)