Rain

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

आरोग्य

वर्षा ऋतू: दिनचर्या व घ्यावयाची काळजी

उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात हा काळ याला “ऋतुसंधी” असे शास्त्रात संबोधन आहे.संपत आलेल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस व पुढे येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस असा 14 दिवसांचा ऋतुसंधी होतो. या संधिकाळात संपणाऱ्या ऋतूची चर्या, आहार,विहार यांचा हळूहळू त्याग करावा व पुढे येणाऱ्या ऋतूला अनुकूल तो सर्व विधी हळूहळू सुरू करावा.

आहार: पावसाळ्यात पचनशक्ती कमी असल्याने ताजा,गरम,पचायला हलके असा आहार घ्यावा.दूधाचे आटवलेले पदार्थ (पनीर,दही, खाव्याचे पदार्थ इ) तळलेले व अंडी नॉनव्हेज चे पचायला जड पदार्थ टाळावेत. विविध गरम सूप,हलके काढे,ताजे गरम अन्न यांचा आहारात समावेश करावा.

unique international school
unique international school

विहार: गरम कपडे, कानटोपी, यांचा वापर करावा.घर व रूम गरम ठेवावी.रूम हिटर, शेगडी यांचा वापर करावा.पावसात भिजणे टाळावे.भिजल्यास विशेषतः लहान मुलांना लगेच अंग कोरडे करून कपाळ नाक छातीला कोरडी सुंठ वेखंड पावडर चोळावी. गरम फडक्याने तव्यावर शेकावे.

पंचकर्म व उपक्रम: वर्षा ऋतूत वाढलेल्या वात दोषाचे शमन करण्यासाठी बस्ती हा पंचकर्म उपचार करून घ्यावा. स्नेहन (अंगाला तेल लावणे विशेषतः तीळतैल) स्वेदन (दशमूल आदी औषधी द्रव्यांची वाफ घेणे) उटणे लावणे,गरम पाण्याने स्नान, घरात धूप लावणे, गरम व उबदार वस्त्र घालावीत.

दिवसा झोपणे, अति व्यायाम ,मैथुन कर्म, जास्त प्रमाणात खाणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात.पाणी दूषित असल्याने उकळून थंड करून किंवा कोमट वापरावे.

(सोशल मीडियावरून साभार)