चवळी खाण्याचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे

आरोग्य
मधुमेह नियंत्रित करते
अलीकडच्या काळात, जगभरातील संशोधकांमध्ये चवळीला खूप लोकप्रियता मिळाली आहे कारण चवळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरली आहे. 2018 मध्ये जर्नल ऑफ फूड अँड अ‍ॅग्रिकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये सूचित करण्यात आले आहे की, आहारात चवळीचा समावेश केल्याने कॅलरीजचे प्रमाण कमी होते. तसेच, चवळी मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ग्लुकोजचे नियमन करण्यास मदत करते.
त्वचेची काळजी घेते
चवळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए अँटिऑक्सिडंट्स म्हणून आपल्या शरीरात काम करतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यास मदत करतात. चिडचिड कमी करतात, चेहऱ्यावरील डाग बरे करतात आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतात.
पचनक्षमता सुधारते
चवळीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या, जसे की, गॅसेस, डायरिआ इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही आहारात चवळीचा समावेश करा. पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर आपल्या आहारातील फायबर हा सर्वोत्तम उपचार आहे. तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि आतड्यांची हालचाल वाढवण्यास मदत करतो.
हृदयाचे आरोग्य सांभाळते
चवळीमध्ये व्हिटॅमिन बी 1 (थायमिन) चे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे, आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन हृदयाच्या कोणत्याही समस्येपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते. या व्यतिरिक्त चवळीमध्ये विविध प्रकारचे फ्लेवोनॉईड्स असतात. ज्यामुळे जळजळ कमी होते. आहारातील फायबर देखील शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
(सोशल मीडियावरुन साभार)