थंडीतला आरोग्योत्सव…

आरोग्य

थंडीत चेहऱ्याला सकाळी दुधाची साय लावल्यास चेहरा उजळतो.

शुद्ध खोबऱ्याचे तेल थंडीमध्ये केसांना नियमित लावल्यास वर्षभर फायदा होतो.

तळहात, तळपायाला ज्येष्ठमध + दूध व तिळाचे तेल लावल्यास तळहात व तळपाय सुंदर राहतात.

हृदय रुग्णांनी छातीला तेल लावणे व दालचिनी, लवंग व मधाचे सेवन करावे.

राजगिऱ्याची अगोड खीर मधुमेहींना थंडीत शक्ती देते.

चण्याचे पदार्थ तुपासह थंडीत खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.

थंडीत गरम पाणी पिल्यास ते “जीवनीय’ ठरते.

मणक्‍याचा विकार असणाऱ्यांनी थंडीत अभ्यंग, स्वेदन, बस्ती अवश्‍य घ्यावी.

परीक्षार्थींनी ज्येष्ठमध व दुधाचे थंडीत सेवन केल्यास बुद्धिवर्धन होते.

थंडीतील उपवासात रताळ्याचा शिरा व साबुदाण्याची वेलचीयुक्त खीर रुची व आरोग्य देते.

व्यायामाला नवीन सुरवात करण्यासाठी “थंडी’चा मुहूर्त चांगला.

तेलाचे अभ्यंग करून व्यायाम केल्यास तेल शरीरामध्ये चांगले शोषले जाते.

थंडीत दही खावे; परंतु काळेमिरे टाकूनच.

थंडीत खूप श्रम, खूप आहार हे तत्त्व ठेवावे.

थंडीत सर्व पचत असले तरी “नुसते खाणे व बसणे’ चालणार नाही.

थंडीत पोट दुखल्यास हिंग व गरम पाणी घ्यावे.

भूक कमी असल्यास तूप व आल्याचे रसयुक्त सूप द्यावे.

लहान मुलांना या काळात शिंगाड्याचे पदार्थ द्यावेत, त्याचा फायदा होतो.

थंडीत मूळव्याधीचा त्रास झाल्यास, सुरण, कांदा व गाजर जास्त खावे व जेवणात ताक घ्यावे.

तरुण-तरुणींनी थंडीत व्यायाम केल्यास सौंदर्य वाढते.

थंडीतील कफावर आल्याचा रस व गरम पाणी व लवंग हे उत्तम औषध होय.

थंडीत तेल लावून उबदार कपडे घातल्याने व उन्हात बसल्याने रात्री झोप चांगली लागते.

थंडीपासून सांध्यांचे संरक्षण करण्यासाठी तिळाचे तेल वापरावे.

तीळ व तिळाचे पदार्थ थंडीत शरीराला शक्ती देतात.

रात्री झोपताना गरम दूध, तूप व केशर घेणे हे सौंदर्यवर्धक टॉनिक आहे.

शुद्ध खोबऱ्याचे तेल थंडीत केसांना नियमित लावावे.

(सोशल मीडियावरून साभार)