सर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती उपाय

आरोग्य

१) लिंबु अर्धे कापून त्यावर काळी मिरी पूड व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते. तुळस+बडिशेपचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे. हिवाळ्यात रोजच्या जेवणा त लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा.हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.

२) चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकून दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यास खोकला कमी होतो. काळी मिरी पूड+सुंठ पूड यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्या पासुन आराम मिळतो. आवळा पूड+मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस + मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.

३) रोज द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो.यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते व कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. पाव????मिरीपूड, पाव????, सुंठपूड, १????मध हे सर्व २ ????पाण्यात मिसळा. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.

४) पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा????खसखस पेस्ट,३-४????नारळाचे दुध,चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोप ताना घेतल्यास कोरडा खोकला कमी होतो. सकाळी उठल्याबरोबर १ किंवा २ ग्लास कोमट पाणी प्या. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे.

५) १०० ग्रॅ पाण्यात भिजवले ली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवा.झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. कोरड्या खोकल्यावर बदाम रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची पेस्ट करून ती सकाळ संध्या लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसं स्थेतील इतर बिघाड थोपवण्या साठी रोज ४ तुळशीची पाने ४ मिरी बरोबर चघळावीत.

६) कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम(कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवा व नंतर त्याचे सेवन करावे.

(सोशल मीडियावरुन साभार)