गुडघे दुखीवर शेवग्याच्या शेंगाचे सूप गुणकारी

आरोग्य

गुडघेदुखीचे अनेक प्रकार आहेत. सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हा सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात. परंतु कायमस्वरुपी गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे.

सूप करण्याची पद्धत
शेवग्याचा दोन शेंगा कापून घ्या. दोन ग्लास पाण्यात दोन लसणाच्या पाकळ्या, किंचित गुळ, अर्धी हिरवी मिरची उकडून घ्या. शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करुन घ्या. त्यात चवी पुरते काळे मीठ टाका. हे सारे मिश्रण स्वच्छ वस्त्राने गाळून घ्या. नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या. साधारण एक ग्लास सूप होईल इतके आटवा. चवी साठी वर कोथिंबीर टाकायची असल्यास टाका. आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या.

(सोशल मीडियावरुन साभार)