थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो.आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते.
सध्या थंडीचा पारा सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे अनेकांना कान दुखण्याचा त्रास होत आहे. त्यातच या काळात अतिप्रमाणात हेडफोन वापरल्यास ही समस्या आणखी वाढते आणि काही वेळा कर्णबधिरपण (श्रवणक्षमता कमी होणे) देखील उद्भवू शकते. त्यामुळे या काळात कानांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कानांची काळजी कशी घ्यावी
1) अनेकजण थंडीपासून संरक्षण म्हणून कानात कापूस ठेवतात. परंतु कापूस दीर्घकाळ कानात ठेवल्यास त्रासदायक ठरू शकतो.
2) अंघोळीनंतर कान नीट पुसणे आवश्यक आहे. कानात ओलावा राहिल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
3) कान साफ करण्यासाठी लोखंडी किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नये. यामुळे कानाच्या आतील भागाला इजा पोहोचू शकते.
4) कान साफ करताना फक्त इयरबड्सचा मर्यादित वापर करावा. कोणतीही वस्तू कानात खोलवर घालू नये.
5) काहीजण थंडीमध्ये कानात गरम तेल टाकतात. हे योग्य आहे, पण पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तेल खूप गरम नसावे, खोबऱ्याचे तेल वापरणे चांगले, आणि ते ताजे असावे.
या सर्व गोष्टींसोबतच आजच्या युगातील सर्वसाधारण कारण म्हणजे मोबाईलचा अति वापर. मोबाईलसोबत हेडफोनचा वापर तर अपरिहार्य झाला आहे.
अलीकडच्या काळात ब्लूटूथ हेडफोनचा वापर झपाट्याने वाढला असून, त्यांच्या रेडिएशनमुळे श्रवणक्षमता कमी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टर गौरव रॉय यांचा सल्ला असा आहे की, हेडफोनचा वापर मर्यादित करावा आणि शक्यतो वायर्ड (तार असलेले) हेडफोन वापरावेत.
थंडीमध्ये कानाची काळजी घेण्यासाठी
कानांना थंडीपासून वाचवा, कानात पाणी किंवा सर्दी जाऊ देऊ नका, कान स्वच्छ ठेवा (पण जास्त खोलवर नाही), सर्दीमुळे कान दुखत असल्यास गरम कापड लावा, झोपताना डोके थोडे उंच ठेवा,
थंडीत कानांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स.
कानांना झाकून ठेवा
बाहेर जाताना कानटोपी किंवा मफलरने कान झाका, जेणेकरून थंडी थेट कानांना लागणार नाही.
कान स्वच्छ ठेवा
कानात जास्त मळ साचू देऊ नका, पण कापसाच्या बोळ्याने फक्त बाहेरील भाग स्वच्छ करा. कॉटन बड कानात खोलवर घालू नका, कारण ते कानाच्या पडद्याला इजा करू शकते.
कान कोरडे ठेवा
अंघोळ करताना किंवा केस धुतल्यानंतर कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या आणि कान चांगले पुसून घ्या. कानात पाणी गेल्यास ते काढण्यासाठी हळूवारपणे डोके एका बाजूला झुकवा.
सर्दी असल्यास काळजी घ्या
सर्दीमुळे कानांमध्ये दाब येऊ शकतो. अशावेळी आडवे झोपण्याऐवजी डोके थोडे उंच ठेवून झोपा. गरम पाण्याची पिशवी किंवा गरम, ओले कापड कानावर ठेवल्यास आराम मिळतो.
कान टोचण्यापासून टाळा
थंडीत कान टोचणे टाळा, कारण जखम झाल्यास इन्फेक्शनचा धोका असतो.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
कान दुखणे, खाज सुटणे, पू येणे किंवा ऐकू कमी येणे यांसारखी कोणतीही समस्या असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा, कारण हे कानाच्या इन्फेक्शनचे लक्षण असू शकते.
कान उकळत्या पाण्याने धुवू नका
कानात काहीही टाकण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)