हिवाळ्यात तापमान घटते आणि वातावरणात गारवा वाढतो. या काळात आरोग्याबरोबरच त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. काही सोपे घरगुती उपाय करून ओठ आणि त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते.
फाटलेल्या ओठांना मऊ आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मध हा उत्तम उपाय आहे. रोज २–३ वेळा ओठांवर मध लावा. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी मध लावल्यास अधिक फायदा होतो.
दिवसातून २–३ वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फाटलेल्या ओठांना आराम मिळतो.
१ चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्र करून हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर हलक्या हाताने ओठांवर लावा.
ओठ फाटल्यानंतर त्यावरील सोललेली त्वचा काढू नका. त्यामुळे ओठ अधिक फाटू शकतात आणि जखम होण्याची शक्यता असते.
घराबाहेर पडताना ओठांवर लिप लोशन किंवा लिप बाम लावणे उपयुक्त ठरते.
हिवाळ्यात अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा अधिक कोरडी पडू शकते.
काही जणांना क्रीम लावल्यानंतर त्वचेवर रिअॅक्शन येऊ शकते. त्यामुळे कोणतीही क्रीम वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)