हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून लवकरच टक्कल पडते की काय अशी भीती वाटू लागते. हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे केस खूपच कोरडे होतात. अगदी झाडूसारखे राठ, रखरखीत दिसू लागतात. अशा केसांना छान मुलायम करण्यासाठी काय उपाय करावा तसेच केसांची वाढ होण्यासाठी गळणं कमी करण्यासाठी काय कराव.
खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि तिळाचं तेल सम प्रमाणात एकत्र करून एका वाटीमध्ये घ्या. त्यानंतर गरम पाण्यात ही वाटी ठेवून डबल बॉईलिंग पद्धतीने हे तेल गरम करा. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मालिश करा. दोन ते तीन तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. नियमितपणे हा उपाय केल्यास अवघ्या २ ते ३ आठवड्यांतच केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
(सोशल मीडियावरून साभार)