आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींमुळे ताण आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
तुम्हालाही सतत ताण येतो का? डोक्यात एकाच गोष्टींचे विचार येतात? चिंता केल्याने त्रास होतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मानिसक आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकता.
1) ताण- चिंतेचा धोका…
तणाव येणं किंवा चिंता वाढणं याची अनेक कारणे येऊ शकतात. यामुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन बिघडल्यामुळे आपला ताण वाढतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा देखील आपल्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे चिंता करणे वाढते. डॉक्टरांच्या मते अशावेळी आपण नकारात्मकतेकडे जाण्यापेक्षा संवाद साधणं महत्त्वाचं आहे.
2) कॅफिनचे अतिप्रमाणात सेवन…
आपण जर चहा आणि कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करत असू तर ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जास्त प्रमाणात कॅफिन प्यायल्याने चिंतेच्या समस्येत भर पडते. तज्ज्ञांच्या मते कॅफिनच्या सेवनामुळे मज्जासंस्था उत्तेजित होतात. याशिवाय कॅफिनमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब देखील वाढतो. ज्यामुळे चिंतेच्या लक्षणात वाढ होते. म्हणून कॅफिनचे कमी प्रमाणात सेवन करायला हवे.
3) सतत नकारात्मक विचार…
तज्ज्ञ म्हणतात की, नकारात्मक विचार हे देखील तणाव वाढण्याचे प्रमुख कारण आहे. नकारात्मकतेमुळे आपण स्वत:वर शंका घेऊ लागतो. काही गोष्टींकडे आपण सकारात्मक भावनेने पाहायला हवे. तसेच पुरेशी झोप न मिळाल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे ताण आणि चिंता वाढू शकते. जीवनशैलीत काही बदल केल्यास या समस्या टाळता येतात.
4) तणाव आणि चिंता टाळण्यासाठी…
पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यासाठी आपण जंकफूडचे सेवन कमी करायला हवे. आहारात पौष्टिक पदार्थ खा.
नियमित व्यायाम, योगा न केल्याने ताण आणि चिंता वाढू शकते. यासाठी किमान ३० मिनिटे व्यायाम करायला हवा.
ध्यान करणे, मोठ्याने श्वास घ्या. ज्यामुळे मन शांत होऊ शकते. चिंता कमी होऊ शकते.
कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने चिंतेच्या लक्षणात वाढ होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)