या ५ पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स…

आरोग्य

बीट आणि गाजर…

बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते.

पपई आणि पपईच्या पानांचा रस…

शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि ब्लड प्लेट्स वाढवण्यासाठी पपई अत्यंत महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी फायदेशीर आहे. जमल्यास पपईच्या पानांचा रस देखील घ्यावा. पपईची पाने पाण्यात उकळावी आणि ते पाणी प्यावं. हे पाणी ग्रीन टी प्रमाणे लागेल.

भोपळ्याचा रस…

भोपळा हा अधिक गुणकारी आहे. भोपळ्याचा रस ग्लासभर घेऊन त्यामध्ये 2 चमचे मध घालून प्या. ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल.

गुळवेल…

गुळवेलचं ज्यूस शरिरात सफेद ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करतात. डेंग्यू झाल्यावर दररोज याचे सेवन करावे. यामुळे ब्लड प्लेट्स वाढल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.

लाल फळ आणि भाज्या…

टोमॅटो, प्लम, टरबूज, चेरी सारखी फळे आणि भाज्या खाल्यामुळे विटामिन आणि मिनिरल्ससोबतच अॅन्टी ऑक्सिडेंट्सची मात्रा वाढते. यामुळे शरीरातील ब्लड प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरुन साभार)