कॅन्सर म्हटला कि डोळ्यासमोर येतो एक कोपर्या मधला बिछाना, जर्जर झालेला एक देह आणि या संपूर्ण वेळेत त्या शरीरालाहोणार्या असह्य वेदना,त्या वेदना बघवत नाहित म्हणुन पोटच्या पोराच्या किंवा सख्या आईबापाच्या मृत्युची देवाकडे प्रार्थना करणारे जीवलग.अंगावर काटायेणारं हे द्रुश्य बघुन कॅन्सर पेक्षा त्यातून निर्माण होणार्या वेदनांचा विचार करून माणुस गर्भगळित होतो. हे सत्य आहे कि कॅन्सर मध्ये असह्य वेदना होतात,पण हे खरे तर अर्धसत्य आहे. कारण कॅन्सर म्हणजे वेदना हे समिकरण जे जोडले गेले आहे ते अत्यंत चुकिचे आहे.कर्करोगी सामान्य आयुष्य जगू शकत नाहितच का. त्याना वेदनी रहीत आयुष्य नाही का. र्करोगी पण वेदना रहीत आयुष्य जगु शकतो.आपले रोजचे व्यवहार सामान्यपणे करु शकतो. कर्करोगचे अगोदरच्या पायरीवर निदान व्हायला हवे. योग्य उपचार पद्धतीमुळे कर्करोग बरा होऊ शकतो.
कर्करोग झाल्यावर वेदना का होतात याची कारणे बरीच आहेत.
1) कर्करोगाच्या गाठीमुळे
२) कर्करोगावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे
३) उपचार पद्धतीमुळे (केमोथेरपी, रेडियोथेरपी)
4) कर्करोग ईतरत्र पसरल्यामुळे जसे हाड ,मंडका, मेंदू, जठर, फुफुंस ई. या सर्व परीस्थितीत रूग्णाला वेदना होतात. वेदना या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. जसे ठणका लागणे, जळजळ होणे, सुया टोचल्या सारखे वाटणे वेदना अधुनमधुन किंवा सतत होत राहतात. कर्करोग म्हटला की वेदना अपेक्षित आहेत मग यावर उपाय काय
आपल्याला कर्करोग आहे हे आधि स्वतः मान्य करावे आपल्याला हा कसा झाला ,मलाच का झाला या सर्व गोष्टींचा विचार न करता तज्ञांचा सल्ला घ्यावा,रोगाच्या प्रकारानुसार मग उपचार तज्ञांना ठरवु द्यावा. कर्करोगाचे निदान होताच वेदना निवारण तज्ञांचा सल्ला घ्यावा कारण वेदना एकदा सुरू झाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसते वेळीच उपाययोजना केल्यास परीस्थिती नियंत्रणात राहाते. कर्करोगाच्या वेदना निवारणा साठी अनेक उपचार पद्धती आहेत. या मध्ये मुख्यत्वे करुन औषधोपचाराने वेदनांवर नियंत्रण ठेवता येत. या औषधाच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत जसे ठराविक औषधे मृत्यशय्ये वर असताना देतात पण हा अत्यंत चुकीचा समज आहे. वेदना कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. जसे विवीध औषधोपचारांनी वेदना नियंत्रणात ठेवता येतात.
काही प्रसंगी विवीध नसांना नेहमीसाठी बधीर करुन वेदना कायम स्वरूपी कमी करता येतात. अतिशय आधुनिक पद्धती मध्ये मज्जातंतू जवळ विशिष्ठ यंत्रणे व्दारे वेदना शामक औषधे अत्यंत सुक्ष्म प्रमाणात सोडली जातात. या प्रकारामध्ये अतिशय परीणामकारकरीत्या वेदनानिवारण करता येते. भारतात सुद्धा हि उपचार पद्धती आता उपलब्ध आहे. वरील कुठल्या उपचाराचा रूग्णाला फायदा होईल हे रूग्णाच्या आजारावर,प्रकृतीवर अवलंबुन अाहे.यात ठराविक असे नियम नाहीत.तो रुग्ण वेदनारहित राहावा हेच अंतिम उद्धिष्ट आहे. कर्करोगाच्या वेदनांवर विजय नक्की मिळवता येतो आणि सामान्य आयुष्य जगता येऊ शकते
अशी जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी वेदनानिवारणाचा साथीने वेदनांनवर मात केली हे अशक्य नाही.वेदनांनमुळे खचुन न जाता त्यांच्यावर वैद्यकीयशास्त्राच्या मदतीने मात करा.
(सोशल मीडियावरून साभार)