किवी (फळ) बहुगुणी 

आरोग्य

कीवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.

शरीराला आवश्यक असणारी ‘अँटीऑक्सिड्न्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते. किवीमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे व शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते, तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. संधिवात आमवात, दमा यासारख्या रोगांवर किवी हे फळ गुणकारी ठरते. ह्या फळामध्ये तंतूचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींसाठीही उपयोगी ठरते.

किवीमध्ये नसíगकरित्या रक्त पातळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्या तसेच हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे. पाणी व पोटॅशियम अधिक असल्याने लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास किवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्याने फायदा होतो. किवीत ‘के’ जीवनसत्त्व असल्याने फळाचा गर एखाद्या चटका लागलेल्या भागावर लावल्यास जखम लवकर भरून येते. पचन नीट होण्यास हे फळ मदत करते. कोणी खाऊ नये. पित्ताशय व मूत्रपिंडांशी संबंधित आजार असलेल्यांनी हे फळ खाणे टाळावे. काही लोकांना किवीची अॅरलर्जी असू शकते. तोंडाला खाज येते.

(सोशल मीडियावरून साभार)