तळ पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारींचे कारण असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. मुख्यतः अनेक स्त्रियांना ही समस्या असते. यामागे वातावरण, धूळ, बदलते हवामान अशी कारणे असतात. मात्र, याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती, वजन आणि एकंदरीत आपली तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
भेगा घालवण्याचे उपाय
शरीरातील उष्णता हे एक मुख्य कारण असते पायांवरील भेगांचे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकृतीने थंड असलेले पदार्थ खाऊन शरीराची उष्णता कमी करू शकतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 15 ते 20 मिनिटे पाय ठेवावे नंतर तेल किंवा क्रीम लावून मसाज करा. आणि मोजे घालून ठेवा. रात्री झोपताना असे केल्यास दिवसभर पडलेल्या ताणामुळे झालेला थकवा पण दूर होतो. सोडा आणि दुधाने पायांवर मसाज केल्याने पायांवरील मेलेली त्वचा निघून जाते आणि कमी होते.
(सोशल मीडियावरून साभार)