तरुणाईमध्ये वाढते आहे या कॅन्सरचे प्रमाण, कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षण

आरोग्य

प्रत्येकाचीच लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे पदार्थ यात एवढा बदल होत आहे की त्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर दिसू लागला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारात झालेल्या काही ठराविक बदलांचाच एक परिणाम म्हणजे सध्या कोलन कॅन्सरचे प्रमाण जगभरातच खूप वाढले आहे. मोठ्या आतड्यांना होणारा हा आजार असून २५ ते ४९ या वयोगटातील व्यक्तींमध्ये तो जास्त दिसत आहे, असा निष्कर्ष दि लॅसेंट ऑन्कोलॉजीने प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारिरीक व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा ही सगळी या आजाराची मुख्य कारणं असू शकतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. काही अभ्यासकांच्या मते मुळ भारतीय खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली यामुळे या आजारापासून आपण लांब राहू शकतो. पण आता नव्या पिढीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली पुर्णपणे बदलून गेल्या आहेत. त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे.

कोलन कॅन्सरची लक्षणं

1) सतत पोट दुखणं, ओटीपोटात वेदना होणं.

2) काहीही खाण्याची इच्छा न होणं आणी वजन कमी होणं.

3) शौचामधून रक्त पडणे.

4) बद्धकोष्ठतेचा त्रास होणे किंवा शौचाला जाऊन आल्यानंतरही पोट पुर्णपणे साफ झालं आहे, असं न वाटणे.

5) खूप थकवा येऊन अशक्तपणा जाणवणे.

(सोशल मीडियावरून साभार)