जगात अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. तांदुळाचे सेवन आरोग्यासाठी चांगले आहे हे सर्वांना माहितीच आहे. परंतु तांदुळाचे खाण्याच्या पलीकडेही अजून काही फायदे आहेत. काय आहेत हे फायदे जाणून घेऊयात…
फळे लवकर पिकवण्यासाठी: कच्ची फळं बागेतून तोडल्यानंतर अथवा बाजारातून खरेदी केल्यांनतर त्यांना लवकर पिकवण्यासाठी तांदुळामध्ये ठेवून द्या. अधून-मधून फळांना चेक करा कारण जास्त वेळ ठेवल्याने फळं गरजेपेक्षा जास्त पिकतात.
मिठाला पाणी सूटू न देण्यासाठी: अनेकदा मिठाला पाणी सुटल्याचे आपण पाहत असतो. अशावेळी मीठाच्या डब्ब्यामध्ये तांदूळाचे काही दाणे टाकले तर तांदूळ मीठाचा ओलावा शोषून घेतात व मीठ ड्राय राहते. पावसाळ्यामध्ये याचा जास्त उपयोग होतो.
ब्लेंडरला धार लावण्यासाठी: ब्लेंडरची धार कमी झाली असेल किंवा ते व्यवस्थित काम करत नसेल तर यामध्ये तांदूळ मिक्स करुन फक्त 2 मिनिटे ठेवा. मात्र तांदूळासोबत दुसरे काही मिसळू नका. यामुळे तुमच्या ब्लेंडरची धार अधिक धारधार होईल.
मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यात पडल्यास: तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यात पडल्या असतील तर काळजी करू नका त्यांना पाण्यातून काढून कमीत कमी 12 ते 24 तास तांदूळामध्ये बुडवून ठेवा. यामुळे तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ओलावा दूर केला जाऊ शकतो.
त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी: तुम्ही ज्यावेळेस भात बनवता त्यावेळी भातात जास्त पाणी पडले असेल तर त्याचा उपयोग तुमच्या त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी होतो. त्यामुळे ते पाणी फेकून देऊ नका. या पाण्याने त्वचेवर मसाज करा.
तेलाचे तापमान तपासण्यासाठी: तुम्हाला काही तळायचे असेल किंवा काही फ्राय करायचे असेल तर तुम्ही तेल गरम करत असता. पण अशावेळी तेल गरम झाले की नाही हे लवकर कळत नाही. अशावेळी तेलामध्ये तांदूळाचा एक दाणा टाकल्यास तो तेलावर तरंगला तर तेल गरम झाले आहे असे समजावे.
गंज लागण्यापासून वाचण्यासाठी: अनेकदा लोखंडाच्या वस्तू पाण्यात भिजल्या तर त्याला लगेच गंज लागतो. अशावेळी या लोखंडाच्या वस्तू गंजू द्यायच्या नसतील तर त्या तांदूळाने भरलेल्या उघड्या कंटेनरमध्ये ठेवा. तांदूळ त्यामधील ओलावा शोषून घेतो व ती वस्तू गंज लागण्यापासून वाचू शकते.
(सोशल मीडियावरुन साभार)