पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढतील या 3 भाज्या

आरोग्य

पांढरा भोपळा:- पांढरा भोपळा आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतो. हिवाळ्यात खासकरून याचं जास्त सेवन केलं जातं. यापासून पेठाही तयार केला जातो. आयुर्वेदात याचे अनेक फायदे सांगितले आहेत.

कसं कराल सेवन?:- पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. यामुळे आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते, मेंदूचं काम सुधारतं, वात पित्त दोष दूर होतात. त्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही याने मदत मिळते.

शेवग्याच्या शेंगा:- आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना शिग्रु म्हणतात. यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतर पौष्टिक तत्व भरपूर असतात. याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

कसं कराल सेवन?:- डॉक्टरांनी सांगितलं की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजीचं सेवन करू शकता. याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

आतड्या साफ करेल आल:- कफ आणि वात दोष दूर करण्यासाठी आलं सगळ्यात फायदेशीर आहे. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते, जुनी श्वासाची समस्या दूर होते, अस्थामा, लठ्ठपणा आणि आतड्यांची सफाई होते.

कसं कराल सेवन?:- पोट आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही प्रत्येक जेवणाआधी आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाल्ला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं की, नुकतीच दिवाळी संपली. अशात अनेकांना बॉडी डिटॉक्सची गरज असेल. या टिप्स फॉलो केल्या तर 10 दिवसात बदल दिसून येईल.

(सोशल मीडियावरून साभार)