गुडघे दुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

आरोग्य

वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करु शकता.

गुडघे दुखीवर घरगुती उपाय:
१) आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे. हळदीचे दूध प्यायल्यास तुम्हाला गुडघेदुखी आणि असह्य वेदनेपासून देखील आराम मिळेल. हळदीच्या दुधाला ‘गोल्डन मिल्क’ असेही म्हटलं जातं. या घरगुती उपायामुळे आपले शरीर देखील मजबूत राहण्यास मदत मिळते.

2) गुडघेदुखीचा त्रास उद्भवल्यास गुडघ्यांना कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. या जेलमधील पोषण तत्त्व त्वचेच्या रोमछिद्रांद्वारे शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आराम देण्याचे कार्य करतात.

3) खोबरं खारीक आणि गुळचे मिश्रण करुन रोज खाल्ल्यास आपल्याला कधीच गुडघेदुखी अशा प्रकारचे आजार होणार नाही.

4) थंड पाण्याने गुडघे शेकणे हा उपाय फार जुना आहे. यामुळे रक्त वाहिन्यांना आलेली सूज कमी होईल आणि तसंच त्या भागातील रक्तप्रवाह देखील सुरळीत सुरु राहण्यास मदत मिळेल. या सोप्या उपचारामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होईल.

5) आल्याचा रस, एक लिंबू आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन रस तयार करा आणि प्या. तसंच आल्याच्या तेलाने तुम्ही आपल्या गुडघ्यांचा मसाज देखील करू शकता. या नैसर्गिक उपायामुळे गुडघ्यांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

6) तुम्हाला सांधेदुखी किंवा गुडघेदुखी फार जास्त असेल अशांनी तर व्यायाम हा करायलाच हवा. पायांचा व्यायाम करताना नेमका तो कसा करावा याचे योग्य मार्गदर्शनही तुम्ही घ्यायला हवे. यासाठी जीम किंवा एखादा असा कोर्स लावा ज्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांच्या उत्तम व्यायाम करुन घेण्यास मदत करेल.

7) दालचिनी, आलं, डिंक पावडर तिळाच्या तेलात कालवून तो लेप दिवसातून एकदा दुखऱ्या गुढघ्यावर लावला तर बराच फरक पडतो.