सामाजिक संघटनामुळे सर्व सामान्य व्यक्तींना मिळतोय न्याय: राहुल श्रीरामे

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य यांसारख्या सामाजिक संघटना ह्या प्रशासन आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्या मधला दुवा असतात. या संघटना अनेक दुर्लक्षित झालेले सामाजिक विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणुन देतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळतो, असे प्रतिपादन पुणे शहराचे वाहतुक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले.

ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे नुकतेच भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिरुर तालुका अध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल श्रीरामे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. राहुल श्रीरामे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पुणे येथील अ‍ॅड आम्रपाली धिवार यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष युवराज झेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर, उपतालुका अध्यक्ष रणजित पाचंगे, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष उमेश गायकवाड, पारनेर तालुकाध्यक्ष योगेश कुलथे, शिरुर तालुका संघटक दत्तात्रय गावडे, शिरुर तालुका सचिव दशरथ पंचरास, सदस्य छाया दरेकर, छाया राजगिरे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पाचंगे, पत्रकार पोपट पाचंगे, ग्रामपंचायत सदस्य मोहन मलगुंडे, प्रिया जगताप, स्वप्निल धिवार, सचिन कदम, अरुण जगदाळे, भाऊसाहेब पाचंगे, उपसरपंच संभाजी मलगुंडे, बाबासाहेब पाचंगे, बन्सी पाचंगे, किरण पाचंगे व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पाचंगे, तर आभार भाऊसो पाचंगेयांनी मानले.