कान टोचण्यामागचे हे आहेत चमत्कारी फायदे

आरोग्य

हिंदू धर्मात मुलांचे कान टोचणे हा एक संस्कार आहे. लहानपणीचं मुलगा असो वा मुलगी सोनाराकडून एक टोकटार सोन्याच्या ताराने कान टोचले जातात. कान टोचणे ही फक्त फॅशन नाही तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात.

आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगाच सुरु केलेली नाही. यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या मध्यभागी जेव्हा प्रेशर लावले जाते. तेव्हा यामधील सर्व रक्तवाहिन्या अॅक्टिव्ह होतात. आज अनेकांना वाटते की, फॅशनसाठी कान टोचले जातात. परंतु जेव्हा तुम्ही याचे फायदे वाचाल तव्हा आश्चर्यचकीत व्हाल.

1)मेंदूचा विकास होतो

कानाच्या खालील भारात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणि उजव्या गोलार्ध्दला जोडला जातो. हे मेंदूच्या भागाला अॅक्टीव्ह बनवते. यामुळे जेव्हा मुलांचा मेंदू वाढत असेल तेव्हाच त्यांचे कान टोचावे.

२)लठ्ठपणा:- ज्या ठिकाणी कान टोचले जातात तेथे भूक लागण्याचा बिंदू असतो. ज्यावर छिद्र केल्याने पनचक्रिया दुरुस्त होते आणि लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी असते.

३)ताण:- एक्यूपंक्चरनुसार जेव्हा कान टोचले जाता तेव्हा क्रेंद्र बिंदूवर दबाव पडल्यामुळे अस्वस्थपणा आणि मानसिक आजार दूर करण्यात मदत मिळते.

४)डोळे:- एक्यूपंक्चरनुसार कानाच्या खालील भागावर केंद्रीय बिंदू आहे. जेथून डोळ्यांच्या रक्तवाहिन्या पास होतात. या बिंदूला दाबल्याने डोळ्यांची शक्ती सुधारते.

५)कान:- जेथे कान टोचले जातात तेथे एक पॉइंट असतो. जो स्पष्ट ऐकू येण्यास मदत करतो.

६)अर्धांगवायू टाळणे:- वैज्ञानिक दृष्टीने कानात छिद्र केल्याने अर्धांगवायू (paralysis) टाळण्यात मदत मिळते.

७) एकाग्रता वाढवण्यात मदत मिळते

प्राचीन काळात गुरुकुल जाण्याअगोदर मुलांची मेधा शक्ती वाढवण्यासाठी आणि चांगले ज्ञान अर्जित करण्यासाठी त्यांचे कान टोचण्याची पध्दत होती. कारण कान टोचल्याने ब्रेन पावर वाढते आणि एकाग्रता वाढण्यात मदत मिळते. याच कारणामुळे भारतात बाळ जन्माला आल्याच्या आठ महिन्याच्या आत त्याचे कान टोचले जातात.

(सोशल मीडियावरुन साभार)