पाणी उकळण्याच्या तीन पद्धती, या गंभीर समस्या लगेच होतील दूर….

आरोग्य

पाणी उकळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

जर पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहण्यापर्यंत उकळलं तर याने वात दोष दूर होतो. जर पाणी अर्ध कमी होईपर्यंत उकडलं तर याने पित्त दोष कमी होतो. जर पाणी उकळल्यानंतर केवळ एक चतुर्थांश शिल्लक राहीलं तर याने कफ दूर होतो. अशाप्रकारे पाणी उकळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि तापही कमी होतो.

कफ दोषाची लक्षण:- कफ दोष असंतुलित झाल्यावर शरीरावर चिकटपणा जाणवतो. कफ जमा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, चिकट घाम, शरीर जड वाटणे, सुस्ती, आळस, जास्त झोप येणे अशी लक्षणं दिसतात.

पित्त दोषाची लक्षण:- पित्त वाढल्यावर व्यक्तीला फार जास्त थकवा जाणवतो, जास्त झोप येते, शरीरात जळजळ होते, जास्त गरमी लागते, जास्त घाम येतो, शरीरातून दुर्गंधी येते, चिडचिड जास्त होते, चक्कर येते, लघवी पिवळी येते, डोळेही पिवळे दिसू लागतात.

वात दोषाची लक्षण:- वात दोषाला हवेशी जोडण्यात आलं आहे. वात असंतुलित झाला तर पोट खराब होतं, बद्धकोष्ठता होते, पोटात दुखतं, गॅस होतो, तोंडाची चव कडवट होते, हाडांमध्ये वेदना होतात.

(सोशल मीडियावरून साभार)