गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल 

आरोग्य

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तसेच सतत उभं राहणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. दीर्घकाळ उभं राहणं, वजन वाढ, वाढतं वय, संधिवात किंवा स्नायूंवरील ताण यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना जाणवते. या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय शोधणं अनेकांसाठी आवश्यक असते.

गुडघेदुखीवर आपण घरच्याघरीच अनेक घरगुती उपाय देखील करु शकतो. या उपायांपैकीच सगळ्यांत सोपा आणि सर्वोत्तम असा घरगुती उपाय म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले औषधी तेल. अशा प्रकारच्या घरगुती तेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये वेदनाशामक, सूज कमी करणारे आणि उष्णता नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. अशा घरगुती तेलाचा रोज वापर केल्याने गुडघ्यांची दुखणी हळूहळू कमी होतात आणि सांध्यांमध्ये लवचिकता येते.

तीळाचे तेल, लसूण पाकळ्या, ओवा, लवंग, मोठी वेलची, सुंठ पावडर, जायफळ पावडर यांसारखे नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले तेल सांध्यांवर चोळल्यास वेदना कमी होतात, सूज उतरते आणि गुडघेदुखी कमी होते.

गुडघेदुखीसाठी घरच्याघरीच तेल कसं तयार करायचं ते पाहूयात.  

साहित्य

१. तीळाचे तेल – १ कप

२. लसूण पाकळ्या – ७ ते ८ लसूण पाकळ्या

३. ओवा – १ टेबलस्पून

४. लवंग – ४ ते ५ लवंग काड्या

५. मोठी वेलची – १ मोठी वेलची

६. सुंठ पावडर – १/२ टेबलस्पून

७. जायफळ पावडर – १/२ टेबलस्पून

कृती 

१. एका मोठ्या भांड्यात तिळाचे तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या, ओवा, लवंग, मोठी वेलची, सुंठ पावडर, जायफळ पावडर असे सगळे जिन्नस घालावेत.

२. आता गॅसच्या मध्यम आचेवर हे भांड ठेवून तेल हळूहळू चमच्याने ढवळत राहून उकळवून घ्यावे.

३. तेलाचा रंग बदलून हलकासा सोनेरी होईपर्यंत तेल चांगले उकळवून घ्यावे.

४. आता तेल थोडे थंड होऊ द्यावे तेल थंड झाल्यावर ते बारीक जाळीदार गाळणीने गाळून घ्यावे.

५. गाळून घेतलेले तेल एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करुन ठेवावे.

या तेलाचा वापर कसा करावा

रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल एका वाटीत घेऊन हलकेसे गरम करावे. या गरम तेलाने गुडघ्याची मालिश करावी. हा उपाय दररोज केल्यास गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत