पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

आरोग्य

बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते.

उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान

द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पोटात जळजळ आणि अपचन होते.

उभं राहून पाणी प्यायल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरामात बसून पाणी प्या. जर मूत्रपिंडाला हानी पोहचू नये असे वाटत असेल तर, बसून पाणी प्या.

जर आपल्याला कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर, उभं राहून पाणी पिणं टाळा. उभं राहून पाणी प्यायल्यानं, सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो बसून, आरामात पाणी प्या.

जर आपल्याला फुफ्फुसांच्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. यामुळे ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. ज्याचा थेट दुष्परिणाम फुफ्फुसांवर आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो.

उभं राहून पाणी प्यायल्यानं तहान भागत नाही. सतत पाणी पिण्याची इच्छा होत राहते. जर आपल्याला वारंवार पाणी पिण्याची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणं टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)