डिजिटल अरेस्टच्या नावाने महिलेला ६१ लाखांचा गंडा

महाराष्ट्र

संभाजीनगर: सायबर भामट्यांनी सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करत संभाजीनगर येथील ५५ वर्षीय महिलेला तब्बल ₹६१,७४,००० चा गंडा घातल्याची घटना ४ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान घडली.

“तुमच्यावर ड्रग्ज, मनी लाँड्रिंग, आणि आयडेंटीटी थेफ्टचे आरोप आहेत”, असा धक्कादायक दावा करत, ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची धमकी दिली गेली. व्हिडीओ कॉलवर दबाव टाकत, “तुमच्या खात्यात ब्लॅक मनी आहे”, असे सांगत आरोपींनी महिलेकडून रक्कम उकळली.

लीना जगदीश नांदापूरकर (वय ५५, रा. पार्वतीनगर, उल्कानगरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार

त्यांच्या पतींचे कोरोनाकाळात निधन झाले होते.

पती कंपनीत एचआर मॅनेजर होते.

त्यानंतर मिळालेले पैसे त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले होते.

४ मार्च रोजी त्यांना एक व्हॉट्सॲप कॉल आला.

कॉल करणाऱ्याने “मी कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलतोय”, असे सांगितले.

एका नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने आधार व पॅनचा गैरवापर केल्याचे सांगण्यात आले.

CBI चौकशी सुरू असून अटक टाळायची असेल तर बँक खात्यातील रक्कम तपासणी खात्यात ट्रान्सफर करा”, असा दबाव टाकण्यात आला.

त्यामुळे घाबरलेल्या लीना नांदापूरकर यांनी

१२ मार्च – म्युच्युअल फंडमधून ₹४५.३० लाख ट्रान्सफर

१५ मार्च – ₹९.४५ लाख

२४ मार्च – ₹५.५० लाख

१७ एप्रिल – ₹९९,०००

एकूण रक्कम: ₹६१,७४,०००

त्यानंतर…

१७ एप्रिलनंतर आरोपींचे कॉल आणि व्हॉट्सॲप बंद

दुसऱ्या दिवशी लीना यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही नंबर बंद त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर लीना यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली असून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या धमक्यांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.