भारताचा पाकिस्तानवर थेट वार! पाणी बंद! व्हिसा बंद! बॉर्डर बंद

महाराष्ट्र

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा!

भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा

सिंधू जल करार ताबडतोब स्थगित

पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील.

अटारी-वाघा सीमेवर कुलूप

१ मेपूर्वी भारतीयांना परत यावं लागेल, मग कोणालाही प्रवेश नाही! सीमा बंद म्हणजे बंदच

पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा फुल्ल कॅन्सल

सार्क व्हिसा सवलत संपली! ४८ तासांत देश सोडावा लागेल कोणतीही सवलत नाही – शून्य सहनशीलता

पाकिस्तानी उच्चायोगातील सैन्य सल्लागारांना बाहेरचा रस्ता

दिल्लीतील पाक अधिकाऱ्यांना आठवड्यात OUT! भारतीय अधिकारीही पाकिस्तानातून परत! *दोन्ही देशांच्या उच्चायोगात संख्याबळ कमी

उच्चायोगात फक्त ३० स्टाफ – बाकी OUT

१ मेपासून नियम लागू भारत आता सहन करणार नाही, तर सडेतोड उत्तर देणार

दहशतवादाला आता ठोक उत्तर

क्युकी भारत बदल रहा है

जय हिंद! वंदे मातरम