विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या १०वी (SSC) आणि १२वी (HSC) परीक्षांचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maharashtra HSC Board Exam 2026 – बारावी परीक्षांचे वेळापत्रक

लेखी परीक्षा: १० फेब्रुवारी २०२६ → १८ मार्च २०२६ पर्यंत

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन: २३ जानेवारी २०२६ → ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत

IT व सामान्य ज्ञान (Online Exam): या कालावधीतच पार पडतील.

विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक विषयांसाठी वेळेत तयारी सुरू करावी!

Maharashtra SSC Board Exam 2026 – दहावी परीक्षांचे वेळापत्रक

लेखी परीक्षा: २० फेब्रुवारी २०२६ → १८ मार्च २०२६ पर्यंत

प्रात्यक्षिक परीक्षा: २ फेब्रुवारी २०२६ → १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान

IT आणि सामान्य ज्ञान विषयांच्या परीक्षा: याच कालावधीत ऑनलाइन घेतल्या जातील.

MSBSHSE 2026 Board Exam Schedule – सविस्तर वेळापत्रक कधी येणार?

मंडळाने सध्या मुख्य तारखा जाहीर केल्या आहेत.

विषयानुसार सविस्तर वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर प्रसिद्ध केले जाईल.

विभागीय सचिवांना हे वेळापत्रक सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.