बुद्धिस्ट ब्रेवरमैन बनली ब्रिटनची गृहमंत्री…!

महाराष्ट्र

गोवा: मुळ भारतातील गोव्याची असलेली बुद्धिस्ट ब्रेवरमैन या कर्तबगार महिलेला ब्रिटन सरकार मध्ये ५६ वी गृहमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.

भारतीय मुळ असलेल्या बुद्धिस्ट महिलेने अटकेपार झेंडा फडकवल्याची ही गौरवपूर्ण घटना आहे. ब्रेवरमैन ही बुद्धिस्ट आहे. ती लंडनच्या बौद्ध विहारात नियमीतपणे वंदनेला जाते. तीने ब्रिटन संसदेत गृहमंत्री पदाची शपथ घेतांना बौद्ध ग्रंथ “धम्मपदाला” साक्षी मानुन शपथ घेतली आहे.

युनायटेड किंग्डम मध्ये २०१५ पासुन ब्रेवरमैन यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. त्या २०१५ ते २०१७ आणि २०१९ ला सलग 3 वेळा निवडून आल्या आहेत, तर २०२० ते २०२२ या काळात त्या ब्रिटनच्या सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहतं होत्या. अशा ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलेचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले आहे.