cat

रंजक माहिती! मांजर आडवी गेल्यानंतर अनेकजण का थांबतात?

महाराष्ट्र

शिरूर : मांजर आडवी गेल्यानंतर अनेक जण काही वेळ थांबतात, काही वेळ मागे पाहतात किंवा मार्ग बदलून जाताना दिसतात. मांजर आडवी गेल्यानंतर त्या वाटेने जाऊ नये, अन्यथा काही अनुचित घटना घडते, असा अनेकांचा समज आहे. खरं कारण काय आहे, याबद्दल जाणून घेऊयात…

मांजर काळी असेल तर घोर अनर्थ वैगरे होतो असे मानले जायते. शिवाय, अनेकजण विविध तर्क वितर्क लावत. पुर्वीच्या काळी जुने लोकं या गोष्टी जास्त मानायचे. हल्ली याचे प्रमाण कमी झाले असले तरी ही प्रथा किंवा पद्धत नेमकी कशी सुरू झाली याबद्दलची रंजक माहिती अनेकांना नसावी. यामागे एक वैज्ञानिक कारण दडले आहे. हे कारण आता लागू पडत नसले तरी पूर्वीच्या काळी नक्कीच लागू पडायचे.

…म्हणून रस्ता ओलांडत असताना थांबायचे
मांजरीला अशुभ मानण्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण सिद्ध झालेले नाही. पण काळ्या मांजरीला अशुभ मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे, पांढऱ्या मांजरीबद्दल अशुभ आणि अशुभ अशा दोन्ही मान्यता आहेत. प्राण्याने रस्ता ओलांडताना थांबण्याची पद्धत पूर्वी रात्री पाळली जायची. पूर्वीच्या काळी जेव्हा वीज नव्हती तेव्हा वाटेत कोणताही आवाज आला की लोक थांबायचे, जेणेकरून एखादा जंगली प्राणी रस्ता ओलांडत असेल तर तो आरामात रस्ता ओलांडू शकेल. तो आपल्याला इजा करणार नाही आणि त्याने आपले नुकसान होऊ नये यासाठी हे पाळण्यात यायचे. हळूहळू ही परंपरा काळ्या मांजरीशी जोडली गेली. काळी मांजर अंधारात दिसत नाही अशावेळी मांजर किंवा माणूस दोघांपैकी कोणालाही अपघात होऊ नये म्हणून काळी मांजर पाहून अवश्य थांबले जायचे. पण, पुढे ही प्रथा अशुभ मानली जाऊ लागली.

साथीचे आजार टाळण्यासाठी…
मांजर जेव्हा रस्ता ओलांडते तेव्हा थांबण्याशी संबंधित किंवा हा ट्रेंड सुरू होण्यामागे एक खास कारण आहे. खरं तर, अनेक दशकांपूर्वी उंदरांमुळे प्लेगचा आजार पसरला होता आणि या महामारीमुळे हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले होते. मांजराचे मुख्य अन्न उंदीर आहे. अशा परिस्थितीत मांजराच्या माध्यमातून हा संसर्ग नागरिकांमध्ये पसरण्याची शक्यता असल्याने मांजरीपासून अंतर राखण्यास सांगण्यात आले. ज्या ठिकाणाहून मांजर बाहेर पडायचे, तेथे जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने नागरिक थोडा वेळ त्या ठिकाणी जाणे टाळायचे. तसेच ज्या दिशेला मांजर गेली त्या दिशेला जाणे नागरिक टाळायचे. कालांतराने प्लेग कमी झाला. मात्र नागरिकांमध्ये ही पद्धत मात्र कायम राहिली. जसजसा काळ लोटत गेला या पद्धतीला अंधश्रद्धेची जोड मिळाली.