द मार्केट प्लेस सारख्या प्रदर्शनाने महिलांच्या उद्योजकतेची वाटचाल सुकर

महाराष्ट्र

नागपूर: नागपूर शहरात महिला उद्योजक आणि ग्रामीण भा काम करीत असलेल्या महिलांच्या विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. त्यांना काही सी एस आर कंपन्यांनी दिलेली सहकार्याची जोड पाहून आज समाधान वाटले. या निमित्ताने महिलांच्या विकासाला चालना मिळत असून त्यांचा नव ऊद्योजक होण्याचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

चिटणवीस सेंटर येथे आयोजित केलेल्या द मार्केट प्लेस प्रदर्शनाला त्यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रदर्शनातील सर्व स्टॉल वर जाऊन त्यांनी संवाद साधला. उद्योजक महिलांच्या कामाची आणि प्रयत्नांची त्यांनी वाहवा केली. काही प्रमाणात कार्यालयीन कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करून त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी चिटणवीस सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय प्रताप जोग यांनी डॉ. गोऱ्हे यांचे स्वागत केले आणि सेंटरच्या कार्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटिका प्रा. शिल्पा बोडखे आणि विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.