छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वाहनांच्या भिषण अपघातात पिता-पुत्राला मृत्यूने गाठल…

महाराष्ट्र

औरंगाबाद: पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील मंगळवारी सायंकाळी नक्षत्रवाडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी कौशल्या दहिफळे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

चार वाहनांमध्ये झालेल्या या विचित्र अपघातात मोटार सायकल दोन वाहनांच्यामध्ये आली होती. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी कौशल्या दहिफळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहिफळे हे दांपत्य सासरवाडीला जात असताना हा काळाने त्यांच्यावर घाला घातला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा झाला अपघात?

सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हे कुटुंब नक्षत्रवाडी परिसरातून दुचाकीवरून जात होते. एवढ्यात सुसाट वेगाने जाणाऱ्या हायवाने त्यांना उडवले. यात संजय यांची दुचाकी समोर असलेल्या दुसऱ्या हायवाला घडकली. ही धडक एवढ्या वेगाने होती की दुचाकी हायवाच्या चाकाखाली गेली. संजय आणि त्यांचा मुलगा समर्थ हे चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर कौशल्या लांब फेकल्या गेल्या.

हायवाने आधी कारला धडक दिली…

निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुनसार, सदर हायवाने दुचाकीला धडक देण्यााघी महिला चालवत असलेल्या कारलाही धडक दिली. त्यामुळे त्याने खूप वेगाने विरुद्ध दिशेला हायवा वळवला. त्यातच संतोष यांची दुचाकी चाकाखाली गेली. त्यानंतर हाच हायवा समोरील हायवाला जाऊन धडकला.

परिसरात हळहळ

पैठण रोडवर वेगाने जाणाऱ्या हायवांमुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश हायवांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असतो. त्यातच वळणा-वळणाचा हा रस्ता असल्याने अपघातांच्या घटना वारंवार घडतात. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांमुळे शिक्षकाचं अख्खं कुटुंबच संपवल्याची ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.