करंदीत अभिरुप शिष्यवृत्तीतील गुणवंतांचा सन्मान

शिरूर तालुका

शौर्य शेळकेचा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी भारतीय अभिरुप (आयएएस) शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित करत यश मिळवले असून शौर्य सचिन शेळकेने जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक मिळवला असून विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी भारतीय अभिरुप (आयएएस) शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केलेले असताना शौर्य सचिन श्लेके याने जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा, रुद्र अशोक शेळके याने जिल्ह्यात पाचवा तर राज्यात आठवा, मान्यता अशोक राठोड व संस्कार संजय शिंदे यांनी जिल्ह्यात सहावा तर आर्वी संतोष शेळके हिने केंद्रात सातवा क्रमांक मिळवला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सतीश दरवडे, शालिनी गायकवाड, मुख्याध्यापक गौतम गायकवाड यांनी मार्गदर्शन केले तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे भणवान शेळके, केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ कदम, उपाध्यक्ष तेजस खेडकर, माजी अध्यक्ष बापूसाहेब दरेकर, अंकुश पंचमुख, मंगेश ढोकले, उद्योजक अशोक शेळके, सचिन शेळके यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक गौतम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.