छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला. छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. […]

अधिक वाचा..

…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही

राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी संभाजीनगर: राज्य सरकारने औरंगाबाद आणि ऊस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर मधून दर ३६ तासाला १ पुरुष गायब

५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता… संभाजीनगर: गेल्‍या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्‍बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्‍यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्‍हणजे पुरुषांच्‍या बेपत्ता होण्‍यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्‍य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरला मित्राच्या वडिलाचा चाकू भोसकून खून, आरोपीही जखमी…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती, आता पुन्हा पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा भर रस्त्यावरच चाकूने भोसकून खून केल्याचा घटना म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली असून कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरातील 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरणार; हे आहे कारण…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांकडून आस्थापना कर वसुली करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केल्याच्या निषेधार्थ महापालिकेने आस्थापना कराचा निर्णय रद्द केला नाही, तर शहरातील तब्बल 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दीला आहे. मात्र त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी सामंजस्याने हा प्रश्र निकाली काढण्यासाठी स्थानिक आमदार-खासदार, पालकमंत्री यांच्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेले असून त्यांच्याकडून सुद्धा […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वाहनांच्या भिषण अपघातात पिता-पुत्राला मृत्यूने गाठल…

औरंगाबाद: पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील मंगळवारी सायंकाळी नक्षत्रवाडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी कौशल्या दहिफळे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 87 शाळा बोगस….

औरंगाबाद: नुकतेच राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आली, आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा बोगस असल्याचे समोर आले असून शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या बोगस शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर नामांतराची याचिका न्यायालयाने फेटाळली

शहरांची नावे बदलण्याचा अधिकार सरकारचा औरंगाबाद: छ. संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात मोहंमद हाशम उस्मानींसह इतरांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तर बुधवारी याचिकाकर्त्यांकडून वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी औरंगाबाद नामांतरविषयक अधिकाऱ्यांनी जारी केलेली अधिसूचना कोर्टापुढे सादर करत, शहराप्रमाणेच जिल्हा आणि तालुक्याचेही नाव बदलले आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर कोर्टाने सुनावणीस नकार दिला आहे. तर कोणत्याही […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर शहरातील एकाचा मृत्यू, ७ जण जेरबंद…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथील राम मंदिरासमोरील राड्यात जखमी झालेल्या एकाचा काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला असून या राड्या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून शेख मुनिरुद्दिन मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्यांची नाव खालीलप्रमाणे सय्यद नूर सय्यद युसुफ (वय 27), धंदा – मजुरी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात राम मंदिराबाहेर दोन गटात तुफान राडा

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ… औरंगाबाद: सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, छत्रपती संभाजीनगरातील किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना […]

अधिक वाचा..