ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात लाखों रुपये, कसे जाणून घ्या…

महाराष्ट्र

कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड विमा देते?

ATM कार्डनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकांच्या नियमांनुसार जर 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असेल, तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते.

कोणत्या ATM वर किती विमा मिळतो..?

ज्या व्यक्तींकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये,

प्लॅटिनम कार्डवर दोन लाख रुपये,

ऑर्डिनरी मास्टरकार्डवर पन्नास हजार रुपये,

प्लॅटिनम मास्टरकार्डवर पाच लाख रुपये.

तसेच ज्यांच्याकडे व्हिसा कार्ड आहे त्यांना लाखापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.

*रुपे कार्डवर एक ते दोन लाख रुपयांचा विमा देखील मिळतो.

वेगवेगळ्या परिस्थितींसाठी किती विमा?

जो कार्डधारक एक हात किंवा एका पायाने अपंग आहे, त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा विमा दिला जातो.

एखाद्याचे दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आलेले आहे किंवा मृत्यू झाल्यास कार्डानुसार त्या व्यक्तीला 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो.

जर एखाद्या कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनी संबंधित बँकेच्या शाखेत दाव्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी एफआयआरची प्रत, उपचार प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. यामुळे काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबियांना बँक खात्यात क्लेम येतो.