कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत, आता काय घडलं बघा…

महाराष्ट्र

बीड: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचे कारण देखील वेगळे आहे. इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच संतापल्याचे दिसतात, कारण सुरु असलेल्या किर्तनादरम्यान, फोटोग्राफर व व्हिडिओ काढणारे त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते, या उलट त्यांनी आपले कॅमेरे सुरुच ठेवले होते.

इंदुरीकर महाराज प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर कमालीचे संतापले होते. कारण यापुर्वी वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात मोबाईलवर व्हिडीओ काढण्यास बंदी घातली आहे. कीर्तनादरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना त्यांनी आधीच इशारा दिलेला होता. त्यानंतर आता बीडच्या परळीतही असाच प्रकार घडल्याने इंदुरीकर महाराज पुन्हा संतापले. आपल्या अनोख्या शैलीत भजन म्हणणं, वेगवेगळी उदाहरणं देणं, किर्तन रंजक करणं या सगळ्यासाठी इंदुरीकर महाराज हे तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत.

इंदुरीकर महाराजांचे मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असून नगर जिल्ह्यातील इंदुरी या गावचे ते रहिवासी आहेत. त्यांना अनाथांचा नाथ म्हणूनही ओळखले जाते. ओझर बुद्रुक येथील त्यांच्या खंडेराव पाटील विद्यालयात 210 विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बहुतांश विद्यार्थी व विद्यार्थिनी निराधार असून या सर्वांचा खर्च इंदुरीकर महाराज उचलतात. इंदूरीकर हे स्वत: BSC बीएड पर्यंत शिकलेले आहेत. शिवाय ते शिक्षक म्हणूनही कार्य करतात. भाकड जनावरे अर्थातच दूध न देऊ शकणार्‍या गायींचे ते संगोपन करतात. अनेक मंदिरांची डागडुजी त्यांनी स्वखर्चाने केलेली आहेत. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून जे काही सांगतात ते पूर्णत: चुकीचे नसते. परंतु, नेहमी टोकाची भूमिका निभावल्याने सध्या त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहेत.

आपल्या कीर्तनातून महाराज शहरी जीवनावर प्रचंड प्रहार करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सम तारखेस मिलन केल्याने मुलगा तर विषम तारखेस केल्यावर मुलगी होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका होत आहेत. तसेच ते तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे भक्त आहेत. परंतु, बोलण्याच्या ओघात त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. पण, तरीही त्यांचे समाजातील योगदान कोणीच नाकारत नाही.

एकदा वादग्रस्त विधानांमुळेही ते चर्चेत आले होते. त्यामुळेत्यांनी किर्तनात अभंग सादर करताना कॅमेऱ्यामनला खाली उतरण्याचा इशारा केला. कॅमेरे बंद व्हावेत, म्हणून त्यांनी थेट कॅमेरा ऑपरेट करणाऱ्याला दमही दिला, यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच कमालीचे संपातले होते. त्यांनी किर्तनात अभंग सादर करताना कॅमेऱ्यामनला खाली उतरण्याचा इशारा केला. अखेर इंदुरीकर महाराजांना शांत करण्यासाठी आणि कॅमेरे सुरु राहावेत, यासाठी धनंजय मुंडे यांना मध्ये पडावं लागलं. त्यानंतर अखेर हा वाद मिटला.

बीडमध्ये एका किर्तन कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात शुट झाली आहे. हा कार्यक्रम बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचा समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी इंदुरीकर महाराज आणि प्रसारमाध्यमांचे कॅमेरे यांच्यात वाद झाला.

‘कीर्तनातलं मधलं कुठलंतरी एक वाक्य उचलायचं आणि त्यानंतर कीर्तनातलं दुसरं कुठलंतरी वाक्य कापायचं, ते एकमेकाशी जोडून फेसबुक, युट्युबवर अपलोड करायचं, याचे परिणाम आम्हाला भोगायला लागतात’, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर, युट्युबवर टाकल्या जाणाऱ्या व्हिडीओवर त्यांनी आगपाखड करतानाच कॅमेरे बंद करा आणि खाली उतरा, असा इशारा त्यांनी दिली. जोपर्यंत कॅमेरामन खाली उतरत नाही, तोपर्यंत ते कॅमेरा ऑपरेट करणाऱ्यांना इशारा देतच राहिले होते.

इतकेच नव्हे तर तुम्ही जबाबदारी घेणार का? व्हिडीओ अपलोड झाले तर, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी सवाल केला. त्यानंतर एक व्यक्ती इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी वर आली. पण तिचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. अखेर धनंजय मुंडे यांना मध्ये पडावं लागलं. धनंजय मुंडे यांनी कीर्तन पुढे सुरु ठेवण्यास विनंती केली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या विनंतीनंतर इंदुरकीर शांत झाले. परळीत घडलेला हा सगळा प्रकार चर्चेचा विषय ठरतो आहे.