jalana goat

बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॉटरी; पाहा किंमत…

महाराष्ट्र

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याचे बोकडाच्या विक्रीतून नशीबच पालटणार आहे. कारण, बोकडाच्या डोक्यावर खास खूण असल्यामुळे मोठी किंमत मिळणार आहे. सध्या या बोकडाच्या दिमतीला सध्या चार माणसं कार्यरत आहेत. संबंधित बोकड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जामखेड गावातील शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. त्यांनी सहा शेळ्यांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. यातील एका बकरीने बोकडाला जन्म दिला आणि प्रदीप यांचे नशिबच पालंटलंय. या बोकडाला लाखो रुपयांची मागणी आहे. या बोकडावर विशिष्ट खून आहे. ही बाब त्यांनी इतरांना सांगितली. दुसऱ्या एका शेतकऱ्याने त्यांना हा बोकड खूप भाग्याचा असल्याचे सांगितले. त्यामुळं त्यांनी या बोकडाचं चांगलं संगोपन केलं. त्याला मका आणि इतर पौष्टिक खाद्य दिले. सध्या हा बोकड चौदा महिन्यांचा असून याला बाजारात चांगली मागणी आहे.

परिसरात या बोकडाची चर्चा सर्वत्र झाली. बोकड चोरी जाण्याची शक्यता बळावली आहे. कुटूंबातील चार सदस्य या बोकडाच्या दिमतीला कायम हजर असतात. 24 तास त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

माझ्याकडे काही शेळ्या असून त्यातील एका शेळीला हा बोकड झाला. त्याच्या कपाळावरची खून बघून मला त्याचे पालनपोषण करण्याचा सल्ला एकाने दिला. आता हा बोकड चौदा महिन्यांचा झाला आहे. त्याला तीन लाखांपासून दहा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. पण आम्हाला याच्या विक्रीतून 12 ते 15 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, असे प्रदीप म्हस्के यांनी सांगितले.