sudam-salunke-eknath-shinde

मुख्यमंत्र्यांकडे मागणी! प्रत्येक गावात दोन उपसरपंच करा…

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावाला दोन उपसरपंच असावेत, अशी मागणी वैजापूर तालुक्यातील मनूर गावातील माजी सरपंचांकडून करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाला देखील दोन उपसरपंच असावेत अशी मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

राजीव सुदामराव साळुंके असे या माजी सरपंचांचे नाव आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच असावेत, अशी मागणी साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

दरम्यान, राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली ही मागणी चर्चेचा विषय ठरली आहे. राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, मग गावाच्या विकासासाठी सुद्धा दोन उपसरपंच असावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.