मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे आमदार साजीद खान पठाण १९ ऑगस्ट रोजी स्वीकारणार आहेत. त्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, CWC सदस्य नसीम खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, अनिस अहमद, अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष वजाहत मिर्झा, विभागाचे प्रभारी अहमद खान, एम. एम. शेख, मनोज विश्वास आणि डॉ. फरिद काझी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
आमदार साजीद खान पठाण यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी सोपविल्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच अल्पसंख्याक समाजाशी संवाद वाढविण्यावर काँग्रेसचा भर राहण्याची शक्यता आहे.