मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी : Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia’ या विशेष नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, MSFDA चे कार्यकारी संचालक Shailendra Deolankar, उपसचिव अशोक मांडे आणि सहसंचालक अर्चना बोराडे उपस्थित होते.
१५ ते १९ जून २०२६ या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या निवासी कार्यक्रमात देशातील नामवंत कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी महिला नेतृत्वकर्त्यांचे मार्गदर्शन सहभागींस लाभणार आहे. मार्गदर्शकांमध्ये Bhushan Patwardhan, Shashikala Wanjari, Hemlata K. Bagla, Manali Kshirsagar, Vidya Yeravdekar, Jyoti Jadhav, Varsha Thakur-Ghuge आणि Tejaswi Satpute यांचा समावेश आहे.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असला तरी नेतृत्वाच्या उच्च स्तरांवर त्यांचे प्रतिनिधित्व अधिक वाढण्याची गरज आहे. महिलांमध्ये शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थात्मक नेतृत्वासाठी आवश्यक दृष्टी, कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या अंतर्गत Project Based Learning, Teaching Smart: Soft Skills, Life Skills and AI तसेच CO-PO Integration and Micro-Planning for Outcome-Based Accreditation यांसारख्या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, कौशल्य विकास आणि Outcome-Based Education संदर्भातील मार्गदर्शन दिले जाणार आहे.
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, अध्यापनातील नावीन्य, शैक्षणिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यांना चालना देण्यासाठी हे कार्यक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगून इच्छुक प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.