राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक …

महाराष्ट्र

मुंबई: बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील 11 दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्‍या गुजरात मधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए, हमे माफ करो बिल्कीस बानो, मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी, नही चलेगी, महिलाओं को दे सम्मान तो होगा देश महान, वाह मोदी तेरा खेल दोषी बाहर निर्दोष जेल, बलात्कारियों के लिए अमृतकाल, भाजपा हटाओ, बेटी बचाओ, बात नारी सम्मान की, कृती गुनाहगारोंको छोडने की, अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

१५ ऑगस्ट २०२२ रोजी एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना बिल्कीस बानो यांच्यावरील बलात्कारी नराधमांना गुजरातमध्ये शिक्षेतून सूट देऊन मुक्त करण्यात आले. हा स्वातंत्र्याला काळिमा फासणारा निर्णय म्हणजे एकट्या बिल्कीस बानोला नाही तर अखंड भारतातल्या स्त्रियांना डागण्या देणारा आहे. या निर्णयाविरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवीन राष्ट्रवादी भवन मुंबई येथे हे आंदोलन करण्यात आले. शिवाय संपूर्ण भारतभर बिल्कीस बानो प्रकरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले.