दिल्लीत शिवसेनेची रणनीती बैठक; अधिवेशनात आक्रमक भूमिका ठरली

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पक्षाची भूमिका, मांडणीची रणनीती आणि सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशासमोरील आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारा आर्थिक परिणाम, पुरवठा साखळीतील […]

अधिक वाचा..

अंमली पदार्थ विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; पोलीस अधीक्षकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात […]

अधिक वाचा..

प्रदूषणाविरुद्ध गणेश नाईक आक्रमक; 54 टायर कारखान्यांना बंदची नोटीस, नियमभंगावर कारवाईचे आदेश

पालघर: वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा तालुक्यातील प्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेत प्रदूषण करणाऱ्या टायर कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. डाकिवली व कोनसई येथील ग्रामस्थांनी जनता दरबारात तक्रार केल्यानंतर नाईक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला संबंधित कारखान्यांची तातडीने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांना टाळे ठोकण्याचे निर्देश दिले. वाडा तालुक्यात सुमारे 74 टायर पायरोलोसिस कंपन्या […]

अधिक वाचा..

मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. “कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा […]

अधिक वाचा..

लोकसभा दणाणली! कळीच्या मुद्द्यांवर चर्चेला टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली. सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ […]

अधिक वाचा..

अंजली दमानिया यांच्याविरोधात राष्ट्रवादीची कायदेशीर कारवाई; रूपाली चाकणकर आक्रमक

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीने काढल्याचे सांगितले जात असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांना फेटाळत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

शिरुर (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या गावांची पाणी प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार…? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न, या प्रश्नावर परस्पर नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत. […]

अधिक वाचा..

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक

न्यायालयाचा आधार आणि शासनाचे सहकार्य घेऊन शिक्षकांना नक्कीच न्याय मिळवून देऊ; डॉ. विशाल कडणे सिंधुदुर्ग: सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर २०२५ मधील निर्णयानुसार इयत्ता १ ते ८ साठी शिक्षक पात्रता परीक्षा(TET) अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षक नेते आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षक […]

अधिक वाचा..

राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची नवी खेळी

कर्नाटक: कर्नाटकमधील महादेवपूरा मतदारसंघात तब्बल एक लाख 250 बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. बोगस मतदारांद्वारे निकाल बदलण्यात आला, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट मतदार याद्यांद्वारे पुरावेच सादर केले. एकाच घरात 80 मतदार राहत असल्याचे त्यांनी समोर आणले. राहुल गांधींनी […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप मीच! भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट आक्रमक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं […]

अधिक वाचा..