भाजपला धक्का! माजी आमदार जीवन दैश यांचा राजीनामा; ‘पक्षात नैतिकता उरली नाही’ असा आरोप

महाराष्ट्र

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर करत पक्षावर नैतिकता ढासळल्याचा गंभीर आरोप केला.तीन वेळा आमदार राहिलेले दैश यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा तीव्र विरोध दर्शवला होता.

दैश म्हणाले की, 2024 मध्ये ओडिशामध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये नैतिकता शिल्लक राहिलेली नाही. CBI च्या चौकशीत अडकलेले आणि जामिनावर जेलमधून बाहेर आलेल्या माजी खासदाराला पक्षात प्रवेश दिला जात असेल, तर पक्ष आपल्या नीती आणि मूल्यांपासून दूर गेला आहे. याचा भविष्यात भाजपला मोठा राजकीय फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य नेतृत्वावर निशाणा साधत दैश म्हणाले की, चिटफंड घोटाळ्याच्या आरोपीला पक्षात घेतल्याने भाजपमध्ये आता नीतीमत्ता उरलेली नाही.

भारतीय वायु सेनेचे माजी सैनिक असलेले जीवन दैश हे 2000 साली प्रथमच भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला आणि 2009 व 2014 मध्येही आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2020 मध्ये काही कारणांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.दरम्यान, राजीनाम्यानंतर दैश कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.