पुणे : कांद्याची आवक कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. कांद्याचे दर होलसेल मार्केटमध्ये 60 रुपये प्रतिकिलो तर किरकोळ मार्केटमध्ये 80 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. मुंबईमधील वाशी सेक्टरमधील मार्केटमध्ये कांद्याची 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
देशभरात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रविवारी कामकाज सुरू असलेल्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 25 ते 60 रुपये किलोवर पोहोचले. दरम्यान, मार्केट बंद असल्याचाही फटका बसला. बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली तर कांद्याच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपये प्रतिकिलो इतके होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर 30 ते 40 रुपये किलो होते. मात्र गेल्या दोन दिवसात यात मोठी वाढ झाली असून ते 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. होलसेल बाजारात कांद्याचे दर 20 ते 25 रुपये प्रतिकिलो होते. ते आता 45 ते 50 रुपये प्रति किलो झाले आहेत. शहरांमध्ये कांद्याची किरकोळ बाजारातील विक्री ही 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर किमान 800 डॉलर प्रती मेट्रिक टन शुल्क लागू केलं आहे. हे निर्बंध 29 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ३५० रुपये अनुदान देण्यास सरकारकडून टाळाटाळ; सतेज पाटील
सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल
कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या