गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेमागे भाजप आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप केला. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असून, काँग्रेस गांधींचा अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तरी पोलिसांना त्याची माहिती नव्हती, यावर विश्वास बसत नाही. गांधी भवनला पोलीस सुरक्षा नसल्याबद्दल त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका, सभ्यता आणि संस्कृती सोडणार नाही,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीचा उल्लेख करत, काँग्रेसने सभ्यता जपत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार मागे घेतला होता, त्यामुळे काँग्रेसला सभ्यता शिकवू नये, असेही त्यांनी सुनावले. तसेच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर पूर्वी करण्यात आलेल्या टीकेचाही उल्लेख करत, त्यांनी आपल्या कार्यातूनच उत्तर दिल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत