शिरुर तालुक्यात विद्युत मोटर चोरी करणारी टोळी गजाआड करत आठ मोटारी जप्त…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील अण्णापूर, मलठण, रामलिंग, आमदाबाद, वडनेर या भागातून अनेक विद्युत मोटारी चोरीला गेल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हांचा तपास करत असताना तपासात आरोपी १ ) सौमित्र नाथा निचित, २ )विकास बबन निचित, ३ )सागर हौशीराम रणसिंग तिघेही रा.वडनेर ता. शिरूर, ४ ) संतोष काशिनाथ मेचे, ५ ) किरण किसन लाळगे दोघे रा. पारनेर यांना अटक करत शिरूर पोलिस स्टेशन मधील दाखल एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असुन त्यांच्याकडून तब्बल आठ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. शिरूर पोलिसांनी १३ विदयुत रोहीत्र आणि ८ विद्युत मोटारीचा तपास केल्याने शेतकऱ्यांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे; उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथक सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, एकनाथ पाटील पोलिस अंमलदार माणिक मांडगे,पोलिस नाईक नाथा जगताप, उमेश भगत, निलेश शिंदे; दिपक पवार, सुरेश नागलोत, विशाल पालवे, नितेश थोरात; रघुनाथ हाळनोर, विनोद मोरे, सचिन भोई यांनी केली आहे.