0%
Skip to content
गुरूवार, ऑगस्ट 20, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर 

महाराष्ट्र
मार्च 3, 2025मार्च 3, 2025शिरूर तालुका टीम

मुंबई: ग्रामीण नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषीपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांना निधी अशा लोकोपयोगी आणि राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी निधीची तरतूद असलेल्या ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या आणि निव्वळ भार ४ हजार २४५ कोटी ९४ लाख रुपये असलेल्या पुरवणी मागण्या आज विधीमंडळात सादर करण्यात आल्या.

आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. सादर केलेल्या ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांपैकी ९३२.५४ कोटींच्या मागण्या अनिवार्य, ३,४२०.४१ कोटींच्या मागण्या कार्यक्रमातंर्गत आणि २,१३३.२५ कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमातंर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सादर करण्यात आल्या आहेत. ६,४८६.२० कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा. ४,२४५.९४ कोटी रुपये आहे.

सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या

अ.क्र. बाब समायोजनानंतरची रक्कम

१) केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) सर्वसाधारण व अ.ज. घटकातील लाभार्थ्यांकरिता पुरवणी मागणी ३७५२.१६ २७७९.०५

२) मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजना- कृषीपंप ग्राहकांना (सर्वसाधारण, अ.जा. व अ.ज. घटक) वीजदर सवलत देण्यासाठी. २०००.०० १६८८. ७४

३) केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी १४५०.०० लाक्षणिक

४) राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान NRLM योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र व राज्य हिस्स्यापोटी ६३७.४२ लाक्षणिक

५) मुद्रांक शुल्क अनुदान – महानगरपालिका व नगरपालिका ६००.०० ६००.००

६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता ३७५.०० २५७.०३

७) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र हिस्सा ३३५.५७ लाक्षणिक

८) ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकांची रक्कम, विद्युत देयकांच्या व्याज व दंडाची रक्कम महावितरणला अदा करण्यासाठी ३००.०० २०९.५५

९) राज्यातील ४ साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलनिर्मितीसाठी मार्जिन मनी लोन २९६.०० २९६.००

१०) पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादनाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेडीसाठी २४४.०० लाक्षणिक

११) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी २२१.८९ लाक्षणिक

१२) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान या घटकाखाली विविध प्रकल्पांसाठी १७५.०० लाक्षणिक

१३) राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी, पुणे- प्रदुषण कमी करण्याचा प्रकल्प १७१.०० १०३.५१

१४) डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेसाठी १५०.०० १५०.००

१५) धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान- केंद्र हिस्सा १००.०० लाक्षणिक

१६) यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करणेबाबत १००.०० लाक्षणिक

विभागनिहाय प्रस्तावित पुरक मागण्या- मार्च, २०२५

अ.क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)

१) ग्राम विकास विभाग ३००६.२८

२) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग १६८८.७४

३) नगर विकास विभाग ५९०.२८

4) उच्च व तंत्र शिक्षण विभाग ४१२.३६

५) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग ३१३.९३

६) पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग २५५.५१

७) महसूल व वन विभाग६७.२०

८) इतर मागास बहुजन कल्याण विभाग ६७.१२

९) सार्वजनिक बांधकाम विभाग ४५.३५

Tagged demandsinfrastructurepublicrural areasschemessubmittedSupplementaryutility

पोस्टचे नॅव्हिगेशन

कोणत्या समस्येत कशाच्या बीया आणि मसाल्यांचं करावं सेवन
दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

संबंधित पोस्ट

सध्याच्या देशातील परिस्थिती वरून खरंच स्वतंत्र उरलं आहे का?

ऑगस्ट 16, 2023ऑगस्ट 16, 2023शिरूर तालुका टीम

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

जुलै 16, 2023जुलै 16, 2023शिरूर तालुका टीम

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मे 1, 2026शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शाळेजवळ बिबट्याचा वावर; विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
  • शिरुर तालुक्यातील ‘भिशी’ प्रकरणात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही कोट्यवधींची गुंतवणूक असल्याची चर्चा…?
  • विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील
  • मुंबईत फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेण्याची संधी; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  • वंदे मातरमच्या वादावरून भाजपवर सपकाळांचा निशाणा; ‘हिंदू-मुस्लीम वाद उकरण्याचे षडयंत्र’

Popular Categories

  • आरोग्य (2,356)
  • इतर (155)
  • क्राईम (1,706)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (175)
  • महाराष्ट्र (5,379)
  • मुख्य बातम्या (2,212)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (998)
  • शिरूर तालुका (2,885)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शाळेजवळ बिबट्याचा वावर; विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
  • शिरुर तालुक्यातील ‘भिशी’ प्रकरणात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही कोट्यवधींची गुंतवणूक असल्याची चर्चा…?
  • विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील
  • मुंबईत फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेण्याची संधी; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  • वंदे मातरमच्या वादावरून भाजपवर सपकाळांचा निशाणा; ‘हिंदू-मुस्लीम वाद उकरण्याचे षडयंत्र’

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!